पुणे

रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता १४ दिवस बंद

CD

उरुळी कांचन, ता. २३ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल, तसेच त्याखालील रस्त्याची मोरी दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पुढील १४ दिवस हा रस्ता बंद राहणार आहे. सोमवारपासून (ता. २२) या उड्डाणपुलाच्या मोऱ्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे. ६ ऑक्टोबरपासून रस्ता पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
उरुळी कांचन हे पंचकृषीतील मुख्य बाजारपेठ केंद्र असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. दत्तवाडी, भवरापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, प्रयागधाम, शिंदेवाडी, मेमाणवाडी, शिरसवाडी, बिवरी, गोते मळा, नायगाव, पेठ, अष्टापूर व हिंगणगाव या २० ते २५ गावांचा येथील बाजारपेठेशी संपर्क आहे. या व्यतिरिक्त नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक हे येथे येतात. मात्र, उड्डाणपूल १४ दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पर्यायी वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. टिळेकरवाडी व खामगाव परिसरातील नागरिकांनी जोगेश्वरी हॉटेल शेजारील रेल्वे मोरीचा वापर करावा. तसेच पुणे- सोलापूर मार्ग अथवा उरुळी कांचनकडे जाण्यासाठी कोरेगाव मूळ रेल्वे फाटक मार्ग वापरावा, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.
परिसरातील नागरिकांना मणिभाई पतसंस्था (उरुळी कांचन) शेजारील रेल्वे मोरी, लोणकर वस्ती येथील मोरी, पेठ येथील मोरी, अल्ट्राटेक कंपनी शेजारील भुयारी मार्ग, कोरेगाव मूळ रेल्वे फाटक या पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे रेल्वे विभागाने सांगितले आहे.

जेजुरी- आळेफाटा राज्यमार्गाचा बाह्यवळण कोरेगाव मूळ रेल्वे फाटकाजवळून जात असल्याने येथे आधीच वाहतूक कोंडी होत असते. नवमोरी रस्ता बंद झाल्यानंतर याठिकाणी वाहतुकीचा ताण वाढणार असून, कोंडी नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात.
- वर्षा कड, पोलिस पाटील, कोरेगाव मूळ

उड्डाणपुलाचे रुंदीकरण वाढवायचे आहे. तसेच, पुलाची दुरुस्ती करायची आहे. त्याकरिता रेल्वे उड्डाणपुलाचा रस्ता १४ दिवसांसाठी बंद ठेवायचा आहे. ६ ऑक्टोबरपासून पुन्हा हा रस्ता खुला करण्यात येणार आहे. तोपर्यंत पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे.
- रामदास बहीर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

03340

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

Poisioning : झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय; ४ महिलांवर उपचार सुरू

Mohol News : नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, बाधित झालेल्या सर्व घटकांच्या नोंदी घ्या; योगेश कदम यांनी दिल्या सूचना

Dickie Bird: क्रिकेटविश्वात शोककळा ! भारताच्या १९८३ वर्ल्ड कप विजयाचे साक्षीदार राहिलेल्या दिग्गजाचे निधन

SCROLL FOR NEXT