पुणे

मांढरदेव घाटात वनविभागातील रस्त्याची दुरवस्था

CD

उत्रौली, ता‌. १३ : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला बुधवार २ जानेवारी २०२६पासून सुरू होत आहे. पुण्यावरून भोर मार्गे मांढरदेव घाटाने जाणे भाविकांना सोयीचे आहे. सध्या कापूरहोळ, भोर, मांढरदेवी, वाई मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून वनखात्याने घेतलेल्या हरकतीमुळे निळकंठ, गोकवडी हद्दीतील १५० मीटर आणि मांढरदेव घाटातील आंबाडे हद्दीतील मसूबाचा पेडा ते कणीचा ओहळ येथील दोन किमी अंतरातील काम बंद असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे घाटातील दरडी रस्त्यावर पडून रस्ते खराब होणे, काही ठिकाणी रेलिंग तुटणे, दिशादर्शक फलक पडणे अशा घटना घडल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच गवत, झाडे, झुडपे उगवली आहेत.

घाटातील वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यावर मुरूम टाकून सपाटीकरण करणे गरजेचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोर मांढरदेवी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी.
-मनोज खोपडे, सामाजिक कार्यकर्ते, आंबाडे

यात्रेच्या निमित्ताने वनविभागातील रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती येत्या आठ दिवसांत सुरू होणार आहे. तसेच मांढरदेवी घाटातील दिशा दर्शक फलक, रिफ्लेक्टर, रंगरंगोटी करणे अशी कामे लवकरच पूर्ण होऊन रस्ता सुरळीत सुरू होईल.
- राजेसाहेब आगळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
- योगेश मटेकर, शाखा अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: पुण्यातल्या पुरंदर विमानतळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; अटल सेतूच्या जवळ उभारणार तिसरी मुंबई

Pune Viral Marriage Story : पुण्यातील तरुणाने लग्नासाठी तयार केली एक्सेल शीट, सोशल मीडियावर रंगली चर्चा, आता येत आहेत एकापेक्षा एक भारी स्थळं

प्रेम भावना व्यक्त करण्याचा 'क्युट' ट्रेंड तरुणाईत लोकप्रिय; नातेसंबंधातील तणावात 'टेडी' सुरक्षित, आपुलकीचा 'कम्फर्ट झोन'

पाकिस्तानच्या लढतीपूर्वी BCCI ने सूर्यकुमार यादवच्या संघाची 'ती' विनंती फेटाळली; बोर्ड म्हणालं, तुम्हाला हवं असेल तर...

त्यांनी माझं उघडउघड शोषण केलं... अरुणा इराणी यांचे मेहमूद यांच्यावर धक्कादायक आरोप; म्हणाल्या, 'माझ्यासाठी खूप मोठा धक्का

SCROLL FOR NEXT