उत्रौली, ता.२३ : धोम बलकवडी (ता. वाई) धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन गुरुवारी ता.१ जानेवारी २०२६ पासून सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून धरणातून ४०० क्युसेक्स वेगाने धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धोम बलकवडी सिंचन उपविभाग क्र.१ वाई उपविभागीय अधिकारी सत्यजित गोसावी, कनिष्ठ अभियंता शाखा भोर,खंडाळा रवी जाधव यांनी दिली आहे.
धोम बलकवडी धरणाचा उजवा कालवा हा १४७ किलोमीटर लांबीचा आहे. पुणे व सातारा जिल्ह्यांतील भोर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील एकूण १८,१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. भोर तालुक्यातील वीसगाव व आंबवडे खो-यातील १९ गावातील १०५० हेक्टर क्षेत्राचा यात समावेश आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता ४.०२ असून धरणात सद्य स्थितीत ९८.४९ टक्के, ३.९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.गत वर्षी ९८.५३ टक्के, ३.९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. ४.०२ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या धोम बलकवडी धरण परिसरात यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले नाही. सद्या भोर तालुक्यातील वीसगाव, आंबवडे खो-यातील परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू यांच्या पेरण्या पूर्ण होऊन बेणणी, कोळपणी कामे शेवटच्या टप्प्यात असून पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी होत आहे. हे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू केले जाणार असून पाण्याचे वितरण केले जाणार आहे.धरणातील सद्यःस्थितीत पाण्याची टक्केवारी चांगली असल्याने उन्हाळ्यातही आवर्तन सोडता येणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिकांना त्यांचा लाभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.