उत्रौली, ता.२६ : हातनोशी (ता.भोर) येथील प्रयोगशील युवा शेतकरी संतोष मधुकर थोपटे यांनी पारंपरिक भात शेतीला बगल दिली व आधुनिक तंत्रज्ञान, खते, औषधे, कीटकनाशके यांचा वापर करून केवळ १२ गुंठ्यांत गुलाब फुलांचा मळा फुलविला आहे. खर्च वजा त्यांना एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. वाढत्या उत्पन्नामुळे गुलाब फुलांच्या सुगंधाचा दरवळ वाढत आहे.
अशी केली लागवड
- जमिनीची ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर फिरविला
- शेतीच्या मशागतीनंतर सहा फुटी बेड बनवून शेणखत भरली
- मातीचा दोन इंचाचा थर देऊन बेसल डोस दिला.
- त्यावर मातीचा तीन इंचाचा थर दिला
-ठिबकच्या पाइपाच्या दोन ओळी एका बेडवर टाकून मल्चिंग पेपर अंथरला
- दोन रोपांत दीड फुटावर छिद्र घेत खड्डा खणून ४ हजार रोपांची लागवड केली
असा दिला बेसल डोस
शेणखत ३ ट्रॉली, गांडूळ खत ८०० किलो, पॉलीसल्फेट २५ किलो, पॉवर बुस्ट ५ किलो, डाय अमोनियम फॉस्फेट २५ किलो, १०.२६.२६-१०० किलो, मायक्रो न्यूट्रीयन १० किलो, बेनसल्फ १० किलो, सागरिका गोल्ड १० किलो, मेटारिझियम २५ किलो, ट्रायकोडर्मा २५० ग्रॅम,रिअल ट्रिक ग्लोड ५ किलो
असा झाला एकूण खर्च १ लाख ७० हजार
रोपे चार हजार (प्रति रोप१८ रुपये) वाहतूक तीन हजार................ ७५,०००
शेणखत तीन ट्रॉली, (४५०० रुपयेप्रमाणे) ................ १३,५००
बेसलडोस................ १३५००
मल्चिंगपेपर दोन बंडल................ २५००
ठिबक चार बंडल................ १४ हजार
फिल्टर, वॉल पाईप............. ४ हजार
किटकनाशके ............. ४० हजार
मजुरी............. ३ हजार
वर्ष.................खर्च.................उत्पादन.................नफा
२०२४-२५.................१ लाख ७० हजार.....२ लाख ७० हजार.... १ लाख
सकाळी फुलांची काढणी करून फुले स्वच्छ पाणी असलेल्या बादलीत ठेवून गुलाबाच्या फुलांची प्रतवारी करून, १० फुलांची गड्डी याप्रमाणे १५० ते १६० गड्डी बनवून स्वतः पुणे येथील गुलटेकडी मार्केटला विक्री केली जाते. फुलाचा आकार, रंग, ताजेतवान्यामुळे ४० ते ५० रुपये गड्डीला बाजारभाव मिळतो. गुलाबाचे उत्पादन पुढील चार वर्षे सहज चालते. यामुळे यंदा खर्च वजा जाता दोन लाखांचा नफा मिळेल.
- संतोष थोपटे, प्रयोगशील शेतकरी, हातनोशी (ता.भोर)
00079
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.