उत्रौली, ता. ३० : धावडी (ता. भोर) हद्दीतील खानापूर पाले रस्त्यावरील खिंडीतील गणोबा मंदिरातील दानपेटी सोमवारी (ता. २९) रात्रीच्या वेळी चोरट्याने फोडून त्यातील रक्कम लंपास केली. या दानपेटीतील अंदाजे चार ते पाच हजार रुपये चोरीला गेले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, चोरट्याने रविवारी (ता. २८) गणोबा मंदिराची पाहणी करून मंदिर परिसराचे फोटो काढून माहिती घेतली, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.