पुणे

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

CD

वडगाव निंबाळकर, ता. ८ : पत्रकार हल्लाप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बारामती तालुका ग्रामीण पत्रकारसंघाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मोरगाव (ता. बारामती) येथील पत्रकार विनोद पवार यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी खुनी हल्ला केला आहे. संबंधित आरोपी मंगेश जगताप (रा.मुर्टी,ता.बारामती), सागर शिनगारे (रा. पांढेश्वर ता.पुरंदर) व इतर चार अनोळखी व्यक्तींवर यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी समाजातील जबाबदार व्यक्तींवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. याचा अर्थ कायदा व सुव्यवस्था याचा धाक राहिला नाही. संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशा मागणीचे निवेदन बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात आले.
यावेळी भोईटे यांनी निवेदन स्वीकारत संबंधित आरोपींवर ३०७ सारखे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीला अटक केली आहे व इतर आरोपीही लवकरच अटक करू, असे आश्वासन यावेळी उपस्थित पत्रकारांना दिले. संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे, माजी अध्यक्ष महेश जगताप, सचिव चिंतामणी क्षीरसागर, उपाध्यक्ष युवराज खोमणे, नाविद पठाण, मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, सचिन वाघ, अमर वाघ, पल्लवी चांदगुडे, सचिन पवार इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनाही बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT