पुणे

कोऱ्हाळे येथे कृषिकन्यांकडून औषध फवारणीविषयी मार्गदर्शन

CD

वडगाव निंबाळकर, ता. ६ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे कृषीदिनानिमित्त पिकावरील औषध फवारणी दरम्यान शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी याविषयी कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या कृषिकन्या रावे उपक्रमांतर्गत कोऱ्हाळे बुद्रुक येथे आहेत. त्यांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना भेटी देऊन हा उपक्रम पार पाडला. यामधे ऐश्वर्या दबडे, साक्षी घुले, मयुरी माहुलकर, अंजली पवार या कृषिकन्यांनी फवारणी करताना संरक्षणात्मक किटचा वापर करावा, यामध्ये हातमोजे, टोपी, गॉगल, जॅकेट, मास्क,पायात बुट असावेत याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले. तसेच वारणी पंपाच्या नोझलमध्ये अडकलेला कचरा तोंडाने फुंकून साफ करू नये. त्याऐवजी खराब झालेला टुथब्रश किंवा बारीक तार वापरावी हे उपाय सांगितले.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी, समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवानी कोकरे देसाई, डॉ. मयूर पिसाळ, डॉ. पल्लवी देवकाते, प्रा. अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT