पुणे

‘वक्तृत्वकला प्रत्येक क्षेत्रात आवश्यक’

CD

वडगाव निंबाळकर, ता. २ : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये असलेली वक्तृत्वकला ही केवळ राजकीय नेतृत्वासाठी नसून आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असते. अधिकारी असो वा उद्योजक किंवा राजकारणी, नेतृत्वगुणांसाठी आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व फार महत्त्वाचे आहे,’’ असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केले.
कोऱ्हाळे बुद्रूक (ता. बारामती) येथील नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वसंतराव पवार स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्‍घाटन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात मॉडेल स्कूल्स, सायन्स व थिंकिंग लॅब, कॉम्प्युटर, लायब्ररी यांसारख्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय समाजमंदिराचे शैक्षणिक केंद्रात रूपांतर करण्याचा उपक्रम राबवला जात असून आतापर्यंत ३०० समाजमंदिरांना वाचनालयाचे स्वरूप देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाचनाची सोय सहज उपलब्ध होत आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश खोमणे, सुनील भगत, नितीन शेंडे, रणजित मोरे, प्रदीपकुमार गिते, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते. दत्तात्रेय भोसले यांनी प्रास्ताविक, तर शैलजा साळवे यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे सचिव रघुनाथ शिर्के यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: शेवता येथे अंतर्गत वादातून एकाचा खून; तीर्थपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: : राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार

CM Yogi Adityanath: माघ मेळा २०२६ ची तयारी जोरात: १५ कोटी भाविकांसाठी योगी सरकारचा मोठा प्लॅन

Malegaon Court Violence : अफवेमुळे मालेगाव न्यायालय परिसरात संतप्त जमावाचा धुडगूस; मोठा अनर्थ टळला

TET Exam Paper Leak : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी छापा टाकताच एकच खळबळ उडाली; शिक्षकांचाही समावेश

SCROLL FOR NEXT