पुणे

गावठी दारूचा अड्डा वाघळवाडीत उद्‍ध्वस्त

CD

वडगाव निंबाळकर, ता. ९ ः वाघळवाडी- सावंतवस्ती (ता. बारामती) येथील गावठी दारू भट्टीवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांवर गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. ८) रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई केली. विजय सुभाष नवले, अनिल रूपसिंग नवले, शैलेश शंकर नवले (सर्व रा. सावंतवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घराशेजारील पडीक जागेत आरोपी बॅरलमध्ये ठेवलेले कच्चे रसायन तापवून दारू तयार करत होते. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच लोखंडी बॅरलमध्ये १००० लिटर कच्चे रसायन, सात रिकामे बॅरल व इतर साहित्य असा एकूण ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस शिपाई नागनाथ परगे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नागटिळक करत आहेत.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT