चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर, ता. २ : अपंगत्व हे आयुष्य संपल्याचे चिन्ह नसते तर नवी वाट शोधण्याची सुरुवात असते हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. सस्तेवाडी (ता. बारामती) आनंदनगर भागातील रहिवासी अनिल विकास गवळी गुरुजींनी मूळचे मुढाळे (ता. बारामती) गावचे असलेले वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अपंगत्वावर मात करत आपल्या शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षकांमधील आयडॉल ठरलेल्या गवळी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
अनिल गवळी जन्मजात अस्थिविंग असले तरी बालपणात मर्यादित का होईना चालता फिरता येत असे; परंतु १६ व्या वर्षी दहावीत असताना पोलिओ सदृश किफोस्कोलिओसिस आजाराने अचानक दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले दोन वर्षे एका जागी बसून राहावे लागले शिक्षण थांबले आत्मविश्वास खचला आणि डोळ्यासमोर अंधार दाटून आला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची मोलमजुरी करणारे शिक्षणाचा घराशी संबंध नव्हता तरीही गवळी यांनी अभ्यास सोडला नाही मित्र हेमंत यादव चंद्रकांत गहिन यांनी शाळेत उचलून घेऊन जात पुन्हा आणून सोडत शैक्षणिक साहित्य ही पुरवली मित्रपरिवाराने अमूल्य मदत केली लहान भाऊ सागर दररोज सायकलवर बसून शाळेत सोडवले दहावी-बारावी दोन्ही परीक्षेत ७६ टक्के गुण मिळवून सर्वांना आदर्श घडवून दिला. माध्यमिक शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा गंभीर होता, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल पिसाळ यांच्यासह सहकारी शिक्षकांनी पुढाकार घेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला हाच टप्पा नव्या आयुष्यातील सुरुवात ठरली.
आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
बारावी शिक्षणानंतर रहिमतपूर येथील डीएड महाविद्यालयात प्रवेश मिळाला दोन काठ्यांच्या आधाराने चालत स्वतः स्वयंपाक करून उदरनिर्वाह करत कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या आधारे सातारा जिल्हा परिषदेत प्रथम नोकरी मिळाली त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक कार्यरत राहिले नोकरी करत आपली अभ्यासाची कास सोडली नाही. पुढे बीए, एमए, डीएसएम, बीएड तसेच एसइटी परीक्षा उत्तीर्ण करत स्वतःचे शैक्षणिक सामर्थ्य सिद्ध केले. दरम्यान, स्वतःच्या वेदना अडचणी बाजूला ठेवून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आई, वडील, भावंडे, पत्नी आणि मुले यांच्या आरोग्य शिक्षणाची काळजी घेत पूर्ण कुटुंबाचा आधार बनले आहेत.
2936
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.