वडापुरी : येथे अहिले सुन्नत वल जमात यांच्या वतीने मोहंमद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीची सुरवात जामा मशिदीपासून करण्यात आली. ती संपूर्ण गावातून (जुलूस) फेरी काढण्यात आली होती. या फेरीमधून मुस्लिम बांधवांनी शांततेचा संदेश दिला. यानंतर मुस्लिम बांधवांच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी पैगंबर शेख, मौला शेख, जमाल पठाण, सलीम पठाण,मलंग पठाण, अफसर शेख,रफिक शेख, बापू शेख, मौलाना मुजफ्फर हुसेन खान, कदीर सय्यद,आयुब शेख,अस्लम शेख सह मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे विशेष सहकार्य लाभले. इंदापूर तालुक्यातील काटी, शेटफळ हवेली, अवसरी, रेडा, रेडणी परिसरात मोहंमद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.