वडापुरी, ता. २३ : इंदापूर तालुक्यातील वडापुरी, अवसरी, शेटफळ हवेली, पंधारवाडी, झगडेवाडी या परिसरात दोन दिवसापासून पुन्हा मंगळवारी (ता.२३) पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकात पाणी साचले. दरम्यान, रविवारी (ता.२१) रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी देखील दिवस- रात्र पाऊस पडल्यामुळे पिकात पाणी साठले असल्याचे पहावयास मिळत आहे. ऊस मका पिकांना या पावसाचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.