वडापुरी, ता. १९ : ‘‘युवकांनी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे,’’ असे मत डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर व श्रीमती रत्नप्रभादेवी महाविद्यालय बावडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर नीरा भीमा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी पार पडले. या हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे बोलत होते.
डॉ. संजीव सोनवणे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेचा उद्देश तसेच युवकांची समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात स्वयंसेवक व स्वयंसेवकांनी शिबिर काळात केलेल्या कामाचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, संस्थेचे संचालक विलास वाघमोडे, संचालक सुरेश मेहेर, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रेय गोळे, डॉ. शिवाजी वीर, डॉ. भरत भुजबळ, सरपंच राधिका प्रशांत गोसावी, माणिकराव खाडे, किसनराव खाडे उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक स्वयंसेविका यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान केला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी प्रास्ताविक केले. बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
डॉ. महंमद मुलानी यांनी शिबिर कालावधीत घेतलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. शिबिर कालावधीतील कामाचा अहवाल प्रा. नामदेव पवार व मयूर मखरे यांनी केला त्याचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते केले. शिबिर काळात शहाजीनगर या गावाची स्वच्छता केली तसेच वृक्षारोपण, पथनाट्यातून जनजागृती, गावाचे भौगोलिक, आर्थिक सर्वेक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांच्या माध्यमातून सलग समतल चर याची बांधणी करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने, डॉ. महम्मद मुलाणी, प्रा. प्रशांत साठे, प्रा. नामदेव पवार, प्रा. नम्रता निंबाळकर, प्रा. प्रकाश करे, प्रा. सचिन आरडे, बंडू राऊत, अशोक पवार, संतोष खाडे यांनी परिश्रम घेतले.
प्राध्यापिका स्वाती राऊत यांनी महाविद्यालय गीत व राष्ट्रगीत गायले. प्रा. रोहिदास भांगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल मगर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.