वेल्हे, ता. ६ : महसूल सप्ताहानिमित्त अडवली (ता.राजगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व राजगड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ११५३ जणांना विविध दाखल्यांचा लाभ देण्यात आला, अशी माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
अडवली येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयामध्ये मंगळवारी (ता.५) अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी संजय ढमाळ, निवासी नायब तहसीलदार मयूर बनसोडे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, माजी सभापती निर्मला जागडे, युवक अध्यक्ष संदीप खुटवड, प्रताप शिळीमकर, मार्गसणीचे माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, ॲड.उल्हास दारवटकर, अंकुश पासलकर, मोनिका बांदल, भरत चोरघे, संतोष वालगुडे, बाबू गोरड, अर्जुन भिलारे, नीलेश खामकर, संतोष दामगुडे यांच्यासह सर्व तलाठी ग्रामसेवक व सर्व विभागांचे खाते प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते संगायो विभाग ,पुरवठा विभाग, विविध दाखले, कृषी विभागामार्फत औजारे वाटप यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. प्रशासनाचे अभिनंदन यांनी केले.
महसूलमधील मंडल अधिकारी स्तरावरील सर्वाधिक ३७१ जणांनी विविध योजनांचा लाभ घेतला तर कृषी विभाग ९०,आधार नोंदणी ४०,पुरवठा विभाग ७८,संजय गांधी, ३७,आरोग्य सेवा ३७६,महावितरण १५,ग्रामपंचायत ३४, महाइसेवा ९५,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ६, स्वच्छ भारत मिशन ५, शिक्षण ६ असे मिळून एकूण ११५३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
दरम्यान, राजगड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांचे काम प्राधान्याने होत असल्याने आमदार शंकर मांडेकर यांनी महसूल
03151
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.