वालचंदनगर ता. २२ : वालचंदनगरचे (ता. इंदापूर) सरंपच संतोष उर्फ कुमार नामदेव गायकवाड यांनी कर्तव्यामध्ये कसूर करून कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ (१) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला आहे.
वालचंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष ऊर्फ कुमार नामदेव गायकवाड हे ९ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत आहेत. सरपंच गायकवाड व तत्कालीन ग्रामसेवकांनी संगनमताने ९ फेब्रुवारी २१ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तन, तसेच कर्तव्यामध्ये कसूर करून अपहार केला असल्याचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीचे सदस्य हर्षवर्धन अर्जुन गायकवाड व इतर दहा सदस्यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेकडे दाखल केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी केली. तसेच, १७ जुलै, ३१ जुलै व ७ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी घेण्यात आल्या. यामध्ये सरपंच गायकवाड यांनी कामकाजामध्ये हलगर्जीपणा, दुर्लक्ष, आर्थिक व प्रशासकीय अनियमता, नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाज करून कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी अहवालामध्ये म्हटले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ (१) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला आहे.
वालचंदनगर ग्रामपंचायतीचा कारभार शासकीय नियमाप्रमाणे स्वच्छ व पारदर्शक केला आहे. कामकाजामध्ये कोठेही अनियमितता नाही. प्रशासनावर राजकीय दबाव असून दबावापोटी कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला असून, आम्ही आयुक्तांकडे म्हणणे मांडणार आहे.
- संतोष ऊर्फ कुमार गायकवाड, सरपंच, वालचंदनगर (ता. इंदापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.