वालचंदनगर, ता. २८ : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये सोमेश्वर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाचा पहिला हप्ता देणार आहे. छत्रपती कारखान्याने १२ टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सभासदांनी सर्व ऊस छत्रपती कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती कारखान्याच्या ६५व्या वार्षिक साधारण सभेमध्ये जाचक बोलत होते.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, अविनाश घोलप, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक डॉ. योगेश पाटील, अशोक पाटील, शिवाजी निंबाळकर, रामचंद्र निंबाळकर, अॅड.श रद जामदार, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, विठ्ठल शिंगाडे, तानाजी शिंदे, प्रशांत दराडे, अजित नरुटे, बाळासाहेब कोळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, मंथन कांबळे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.
यावेळी जाचक म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षात कारखान्याचा कारभार चुकीचा झाला आहे. दोन हंगामामध्ये वॉटर ट्रायल, स्टीम ट्रायल झाली नाही. गतवर्षीच्या हंगामामध्ये आपल्या ४७ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यापूर्वीच्या हंगामामध्ये २९ कोटी झाला आहे. मात्र, सध्या आपल्याला कारखाना सुधारावयाचा आहे. छत्रपती कारखाना एका ऐतिहासिक वळणावर आहे. काही खोड्या करून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे ह्रदय बंद पडले तरीही चालेल पण मी कारखाना बंद पडू देणार नाही. मी असेल, नसेल तरीही कारखाना चालला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.’’
‘‘चालू वर्षीचा गळीत हंगामामध्ये कारखाना वेळेवर सुरु होईल. ऊस तोडणी नियमानुसार होणार आहे. कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही. १५ दिवस अदोगर ऊस तोडणी होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नोटीस बोर्डवरती लावण्यात येणार आहे. हुमणी लागलेल्या व ओढा व नदी काठच्या पूरग्रस्त भागामध्ये नुकसान झालेल्या ऊस तोडणीला प्राधान्य देणार आहे. सोमेश्वर व माळेगाव कारखाने आपल्या छत्रपती कार्यक्षेत्रातील ऊस नेणार नाहीत. आपल्या छत्रपती कारखान्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे खूप मदत करीत आहेत. कारखाना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो.’’
माजी संचालक तानाजी थोरात, सतीश काटे, भाऊसाहेब सपकळ, रवींद्र टकले, पांडुरंग रायते, अमरसिंह कदम, विशाल निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, शंकर रूपनवर यांच्यासह अनेक प्रश्न विचारले. चालू वर्षीची सभा विना बॅरिकेट घेण्यात आल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले.
‘काट्यावरती सोन्याचे ही वजन करा’
या वेळी पृथ्वीराज जाचक म्हणाले, ‘‘छत्रपती कारखान्याचा काट्यावरती वजन अॅक्युरेट असते. सोन्याचेही वजन केले तरीही वजनामध्ये फरक पडणार नाही. रात्री दोन वाजता येऊन वजन करा. खासगी कारखान्याने दिलेला ३२०० रुपये प्रतिटनाचा दर व छत्रपतीच्या कारखान्याचा २५०० रुपये प्रतिटनाचा दर एकसारखा आहे.’’
चौकशीचा ठराव
यावेळी सभासदांनी मागील तीन वर्षामध्ये झालेल्या कारखान्याच्या कारभाराची चौकशी करावी. तसेच चौकशीमध्ये चुकीच्या गोष्टी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव करण्याची मागणी केल्यानंतर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.