राजकुमार थोरात
वालचंदनगर : लासुर्णे (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रुग्णसेवेचा भार इंटरशिप करणाऱ्या डॉक्टरांच्या खांद्यावर आहे.
लासुर्णे, बेलवाडी, कळंब, जंक्शन, आनंदनगर, अंथुर्णे, भरणेवाडी, बोरी, नऊदारे, आठदारे, लालपुरी, जाचकवस्ती, परीटवाडी, चिखली, बंबाडवाडी, कर्दनवाडी, जामदारवस्ती, वैदवाडी या परिसरातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येत असतात. विशेषतः: विविध प्रकारच्या लसी घेण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ३५ हजारांपेक्षा लोकसंख्येचा भार लासुर्णेच्या आरोग्य केंद्रावरती आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आठ कर्मचारी नियुक्तीसाठी आहे. सोमवारी (ता.३) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रामध्ये हजर झाले नव्हते. साडेदहाच्या आसपास वैद्यकीय अधिकारी डॉ. लब्धी शाह आले. तोपर्यंत रुग्णांचा भार शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर होता. येथे डॉ. संकेत जाधव व डॉ. विकास प्रजापती इंटरशिप करीत आहे. सकाळी वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत ते रुग्णांना तपासणी करून उपचार करीत होते. तसेच दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री चोरमले या ही उशिरा आल्या होत्या. लासुर्णेमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधली आहे. तसेच येथे कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसाहत ही आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी उशिरा येत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सरासरी दररोज ७० रुग्णांची तपासणी करण्यात येते. रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यात येत आहेत.
- डॉ. लाब्धी शाहा, वैद्यकीय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.