पुणे

गांजा तस्करी करणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी

CD

वालचंदनगर, ता. ८ : परराज्यातून अमली पदार्थ गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील चौघांना वालचंदनगर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ७) जीव धोक्यात घालून सिनेमा स्टाइल पाठलाग करून कळंब (ता.इंदापूर) येथे अटक केली. इंदापूर न्यायालयाने चौघांना पाच दिवसांची (बुधवार, ता. १२) पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून दोन गोण्यांमधील २४ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा ९९.९४ किलो गांजा, ५ लाखांची मोटार असा २९ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिरोज अजीज बागवान ( वय ३६, रा. कसबा, बारामती), प्रदीप बाळासाहेब गायकवाड, वय २८), मंगेश ज्ञानदेव राऊत वय २९, दोघे रा. मळद, ता. बारामती) व आश्रम अजीज सय्यद (वय २९ ,रा. नीरा वागज, ता. बारामती) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे म्हणाले की, ‘‘बीकेबीएन रस्त्याने शुक्रवारी (ता. ७) पहाटे ५ च्या सुमारास मोटारीमधून अमली पदार्थ गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीकेबीएन रस्त्यावर जागोजागी सापळा लावण्यात आला होता. कळंब जवळ मोटार येताच आरोपींना पोलिस पाठीमागे असल्याची चाहूल लागताच भरधाव वेगाने मोटार पळविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सिनेमा स्टाईलने पाठलाग करून मोटार थांबवून तपासणी केली असता २४ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा ९९.९४ किलो गांजा सापडला. नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांच्यासमोर गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ तस्करीमध्ये आंतरराज्य टोळीचे रॅकेट असण्याची शक्यता असून तपास करण्यात येत आहे.’’

05624

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

Dharashiv Elections : धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत फुट; स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढण्याचे माजी आरोग्य मंत्री सावंत यांचे संकेत!

SCROLL FOR NEXT