पुणे

‘छत्रपती’‍च्या साखर उताऱ्यात झपाट्याने वाढ

CD

वालचंदनगर, ता.१३ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचा गोडवा वाढत असून, साखरेच्या उताऱ्यामध्ये (रिकव्हरी) मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. साखरेचा उतारा बुधवारी (ता.१२) १०.०२ झाला. उतारा वाढल्यास उसाला दरही चांगला मिळणार आहे.या गोडव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याच्या गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. संचालक मंडळाने चालू हंगामामध्ये जास्तीतजास्त सभासदांचा ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे. कार्यक्षेत्रातील सभासदांचा ताजा ऊस गाळपासाठी उपलब्ध होत असल्यामुळे साखरेचा उतार दररोज वाढत आहे. साखरेचा उतारा एक नोव्हेंबर रोजी ८.२६ होता. त्याच्यामध्ये दररोज वाढ होत आहे. यामध्ये पाच नोव्हेंबरपासून लक्षणीय वाढ होत आहे. त्याची सरासरी आता ८.९८ पर्यंत पोचली आहे. चालू वर्षी संचालक मंडळाने ऊस तोडणीचे काटेकोरपणे केलेले नियोजन तसेच ताजा ऊस साखर कारखान्याला गाळपासाठी उपलब्ध होत असल्यामुळे उताऱ्यामध्ये वाढ होत आहे. साखरेचा उतारा चांगला मिळाल्यास सभासदांच्या उसाला दर वाढीव मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने चालू गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे कारखान्याला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे.. सभासदांनी सर्व ऊस देऊन सहकार्य करावे.

क्षमतेपेक्षा अधिक गाळप सुरू
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटची क्षमता दररोज ६५०० टन आहे. गळीत हंगामातील उच्चांकी गाळप बुधवारी (ता. ११) झाले. एका दिवसामध्ये ७९०९ ऊस टन गाळप झाले असून कारखान्याने १२ दिवसांमध्ये ७२ हजारटन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. कारखाना लवकर प्रतिदिन आठ हजार टनापेक्षा जास्त क्षमतेने गाळप करणार असल्याचा विश्‍वास संचालक मंडळाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: आरपीएफमध्ये नोकरी लागली म्हणून गावकऱ्यांनी तरुणाचा सत्कार केला, पण सत्य समोर येताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला

CSK चा जुना भिडू आता झाला 'नाईट रायडर', IPL 2026 साठी कोलकाता संघाची मोठी घोषणा

India Post Bank Bharti: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मेगा भरती! ३०९ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि शेवटची तारीख

मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा मालिकेतून नाही गाण्यातून कमबॅक ! 'राजा राजा' गाण्याचा टीझर रिलीज

Latest Marathi Breaking News Live : बेडरूममध्ये गळफास घेऊन वकिलाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT