पुणे

‘छत्रपती’चे दिवसात ८५२४ टन उच्चांकी गाळप

CD

वालचंदनगर, ता. १९ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मंगळवारी (ता. १८) ८५२४ टन उसाचे गाळप केले असून, २०२५-२६ च्या गळीत हंगामातील एका दिवसामधील उच्चांकी गाळप ठरले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना १ नोव्हेंबरला सुरू झाला आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटची एका दिवसामध्ये ऊस गाळप करण्याची क्षमता ६५०० टन आहे. बुधवार(ता. १२)पासून कारखाना आठ हजार टनांपेक्षा जास्त ऊस गाळप करीत आहे. मंगळवारी (ता. १८) कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामातील ८५२४ टन उसाचे उच्चांकी गाळप केले. कारखान्याने १८ दिवसांमध्ये एक लाख २१ हजार ६२४ टन उसाच्या गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. मंगळवारी १०.४६ टक्के साखरेचा उतारा मिळाला असून, उसाचा सरासरी उतारा (रिकव्हरी) ९.४९ टक्के झाली आहे. मंगळवारपर्यंत एक लाख ६ हजार ७०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तसेच ३२ लाख ५५ हजार युनिट विजेची महावितरणला निर्यात केली आहे. योग्य नियोजनामुळे कारखान्याचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने चालू वर्षी १२ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, जास्तीत जास्त सभासदांचा ऊस गाळप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वच्छ व ताजा ऊस गाळपासाठी येत असल्यामुळे उसाची रिकव्हरी झपाट्याने वाढत आहे. कारखान्यातील कर्मचारी चांगले काम करीत असून कारखाना क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप करीत आहे. तसेच सभासद संचालक मंडळावर विश्‍वास ठेवून ऊस कारखान्याला देत आहे. कारखाना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असून, सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT