पुणे

घरगुती उत्पादनांना नवसंजीवनी

CD

बारामती, ता. २९ : मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने बारामती तालुक्यातील महिलांचे घरगुती व्यवसाय अक्षरशः ठप्प झाले होते. मात्र, आता पाऊस थांबताच सांडगे, पापड, कुरडई, शेवई निर्मितीला गती मिळाली आहे. जवाहरनगरातील पूजा सदाशिव शिंदे यांनी ३० महिलांना एकत्र करून उत्पादनांचे काम पुन्हा सुरू केले आहे. बाजारात ठोक मागणी वाढल्याने कामाचा वेगही दुपटीने वाढला आहे. महिलांना घरबसल्या रोजगाराची स्थिर संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
पूजा शिंदे म्हणाल्या की, ‘‘सध्या ग्राहकांना नवनवीन रेसिपी आवडू लागल्या आहेत. मात्र, बाजारामध्ये हानिकारक कृत्रिम रंग वापरून अनेक उत्पादने तयार करण्यात येत आहे. याचा गंभीर परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावरही होत आहे. आम्ही चालू वर्षापासून देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचा ओरिजनल पल्प वापरून मँगो कुरडई व मँगो शेवई तयार केली असून याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. आम्हाला सांडगे, पापड, कुरडई, शेवई बनविण्याची ठोक ऑर्डर मिळाली आहे. आम्ही परिसरातील सर्व महिलांना एकत्र करून घरातील कामे बघून एकत्र काम करीत आहोत. यामुळे महिलांना घरगुती स्वयंरोज उपलब्ध झाला असून भविष्यात १०० महिलांना रोजगार देण्याचे नियोजन आहे.’’


5666

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यावर मगरीचा जबरदस्त हल्ला; पायाला धरुन पाण्यात ओढत नेलं अन्...

दिल्लीसारखीच मुंबईची हवा प्रदूषित, श्वास घेणंही कठीण, BMC कडून 'या' कामांवर तात्पुरती बंदी, AQI नेमका किती?

Nita Ambani Video: नीता अंबानींचा स्टाफ मेंबरसाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल, यूजर्संनी दिल्या खास प्रतिक्रिया

World AIDS Day 2025: 'ओरल सेक्स'मधूनही एचआयव्ही पसरू शकतो? AIDS संबंधीचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Gondia Crime : वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; अचानक झडप मारली अन्…

SCROLL FOR NEXT