वाल्हे, ता.१ : वाल्हे (ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टी जागवली.
प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अब्दुलगफारखान पठाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण व्हावी, चिकित्सक वृत्ती वाढावी, जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दिवे आयटीआयचे प्राचार्य राजेश धानोरकर, राजेंद्र डोंगरे, आम्रपाली गडवे आदि उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विज्ञान प्रदर्शनासाठी अनिल दुर्गाडे, अतुल गायकवाड, राजेशकुमार सोनवणे, प्रदीप जगताप, निता कांबळे, वैशाली भामे, प्रियांका कणेरे, संदीप जाधव आदींनी परिश्रम घेतले. पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अनिल दुर्गाडे यांनी आभार मानले.
दरम्यान. विद्यालयातील अकरावीतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. यावेळी विज्ञान विषयक विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी अजित फंड होते. याप्रसंगी हरीश अस्वार, आदित्य काळे, बबन जगताप, विशाल चितळे, दत्तात्रेय भोसले, फारूख इनामदार, कोमल शिंदे, अर्चना सासवडे आदी उपस्थित होते.
01139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.