पुणे

दारू पिताना मित्रांमध्ये तुफान हाणामारी

CD

वाल्हे, ता. १५ : येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या मित्रांमध्ये पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर त्यातील एकाच्या जिवावर बेतले. याबाबत हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींवर कारवाई सुरू केली असून, दोन जणांना पकडण्यास यश आले असून, एक जण फरारी आहे.
वाल्हे गावाजवळील एका परमीटरूमध्ये पवन संभाजी शेलार (रा. काळदरी, ता. पुरंदर, सध्या रा. जेजुरी, ता. पुरंदर) हा आपले मित्र तुषार शरद यादव, विकास अर्जुन भोसले (दोघेही रा. पिंगोरी, ता. पुरंदर) व अविनाश आत्माराम पवार (रा. आडाचीवाडी, ता. पुरंदर) यांच्यासोबत मंगळवारी (ता. १४) सायंकाळी
मद्यप्राशन करण्यासाठी आला होता. तेथे त्यांच्यामध्ये दारूच्या नशेत पैशाच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर भांडणामध्ये झाले. त्यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये पवन यास इतर तिघांनी दारूच्या बाटल्या व विटांनी मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. हॉटेलमधील कामगारांनी हा प्रकार हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितला. त्यांनी वाल्हे पोलिस दुरक्षेत्राला कळविले. मात्र, पोलिस येण्यापूर्वीच मारहाण करणारे तिघेही पळून गेले. दरम्यान, वाल्हे पोलिस दुरक्षेत्राचे भाऊसाहेब भोंगळे घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने हॉटेल व्यवस्थापकांनी जखमी पवन यास जेजुरी येथे उपचारासाठी हलविले. मात्र, जास्त रक्तस्राव झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. दरम्यान, बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची फिर्याद पवन याची बहिण ईश्वरी संभाजी शेलार हिने जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली.
दरम्यान, आरोपींपैकी विकास भोसले व अविनाश पवार या दोन जणांना पकडण्यास पोलिसांना यश आले असून, मुख्य आरोपी तुषार शरद यादव हा फरारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT