पुणे

जैन संघटनेची चारा छावणी कौतुकास्पद : सुळे

CD

वाल्हे, ता.२३ : ‘‘यंदाच्या वर्षी दुष्काळाने त्याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पाणवठे ओस पडू लागत असल्याने माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जैन संघटनेने वाल्हे परिसरातील जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली ही कौतुकास्पद बाब आहे. पशुधन वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणेनेसुद्धा उपाययोजना कराव्यात.’’ अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे केली.
वाल्हे (ता.पुरंदर) नजिक भुजबळ कामठवाडी येथे भारतीय जैन संघटनेच्या वतीने जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली आहे. खासदार सुळे यांनी बुधवारी (ता. २२) छावणीला भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे. अतिवृष्टी असो, दुष्काळ असो कोरोना
सारखा नैसर्गिक आपत्ती असो या सर्वांमध्येच भारतीय जैन संघटनेने आपले दातृत्व दाखवून दिले आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा लक्षणीय वाटा असतो.

याप्रसंगी आमदार संजय जगताप, सरपंच अतुल गायकवाड, रमेश नवलाखा, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, पुष्कराज जाधव, गिरीश पवार, संभाजी कुंजीर, हनुमंत पवार, संभाजी पवार, दीपक पवार, सुहास खवले, प्रदीप पोमण, साईनाथ चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, छावणीमध्ये फिरून सुप्रिया सुळे यांनी व्यवस्थेची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जैन संघटनेचे रमेश नवलाखा यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर हनुमंत पवार यांनी आभार मानले.


03042

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT