पुणे

वाल्ह्यात ‘योगा’ची मानवी प्रतिकृती

CD

वाल्हे : वाल्हे (ता.पुरंदर) येथील परिसरामध्ये शासकीय, निमशासकीय शाळा, विद्यालयांच्यावतीने योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये ‘योगा’ची मानवी प्रतिकृती तयार करून ‘योग उत्सव’ रेखाटून त्या सभोवती विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिक ध्यानधारणा, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी योगासने करून योगाचे महत्त्व पटवून दिले असल्याचे प्राचार्य सतीश निगडे यांनी सांगितले.
महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये निगडे व पर्यवेक्षक नाजनीन अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली ''योग उत्सव'' साजरा करण्यात आला. यामध्ये ‘योगा’ची मानवी प्रतिकृती तयार पाचवी ते दहावीपर्यंतच्या जवळपास ५७५ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एक तासभर सामुहूक योगासने करण्यात आली. या योग प्रात्यक्षिकेला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
गतिमान युगात शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम यांना खूप महत्त्व असून प्रत्येकाने नियमितपणे योगासने करायला हवीत, असे सरपंच अतुल गायकवाड यांनी सांगितले.
सहशिक्षक सुदाम गायकवाड यांनी प्रात्यक्षिके दाखविली. विद्यालयातील अतुल गायकवाड, संदीप जाधव, गीतांजली मोरे, शैला गवारी, लक्ष्मण भालसिंग, बाळासाहेब घोडके, संतोष जगदाळे, अनिल दुर्गाडे, सुनील ढवळे, कीर्ती लंभाते, डिंबळे प्रियांका, संगीता पाटील, सोनाली पाटील, नवनाथ शिंदे, बयाजी घायगुडे आदि शिक्षकांनी योग उत्सवामध्ये प्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. 04716

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांवर अंत्यसंस्कारानंतर अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरचं दु:ख मागे सारून लोकांचे अश्रू पुसले

Nagpur: निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर

Latest Marathi News Live Update : पुणे, मुंबई, मराठवाड्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पावसाचा जोर होणार कमी

Ujani Dam: 'मुसळधार पावसामुळे चंद्रभागेने गाठली इशारा पातळी'; उजनीतून १ लाख १५ हजारांचा विसर्ग; नदीकाठी पूरस्थिती कायम

Supreme Court: गंभीर दुखापतीच्या उद्देशाने केलेली कृती क्रूरता; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT