पुणे

पसायदान सहजीवन दिंडीकडून वाल्हे येथील विद्यालयास मदत

CD

वाल्हे, ता. २९ : आळंदी देवाची येथील गो-दान पसायदान विश्वजागृती धर्मदाय या संस्थेद्वारे पसायदान सहजीवन दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या अगोदर एक दिवस पुढे चालत असते. या दिंडीला वाल्हे (ता. पुरंदर) मुक्कामी महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये निवासाची सुविधा करून दिली जाते. संस्थेच्या निर्मलवारी उपक्रमाअंतर्गत त्यांनी विद्यालयास शौचालय बांधण्यासाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
पसायदान सहजीवन पायी वारी दिंडी मंगळवारी (ता. २४) महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये मुक्कामी विसावली. यावेळी दिंडीच्या वतीने स्वच्छ, सुंदर व निर्मलवारी उपक्रमाअंतर्गत ५१ हजार रुपयांचा धनादेश प्राचार्य सतीश निगडे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे रामदास जैद यांनी सांगितले.
या वेळी विद्यालयाच्या वतीने सोहळ्यातील मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर मोरे, रामदास रानवडे, रामदास रानवडे, दत्तात्रेय साबळे, हनुमंत पवार, तारामण कलाटे यांचा सन्मान केला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, विशाल चितळे, उज्ज्वला साबळे, कविता दगडे, सुनील ढोबळे आदी उपस्थित होते.
गो दान पसायदान विश्व जागृती धर्मादाय संस्थचे अध्यक्ष मुबारक शेख म्हणाले, ‘‘पसायदान सहजीवन दिंडीच्या वतीने पालखी मार्गावर विसावा ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, शाळा-विद्यालय आदी मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयांची उभारणी करणे, गो-दान तसेच ग्राम स्वच्छता अभियान आदि उपक्रम राबविले जात आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धारावीचा पुनर्विकास मुंबईसाठी डबल धोक्याचा, वाहतूक कोंडी अन् पुराचा फटका बसण्याची भीती

Satara Crime: 'वेगवेगळ्या गुन्ह्यांतील सराईत दाेघेजण जेरबंद'; पाच वर्षांपासून पोलिसांना देत हाेता गुंगारा

Amal Mahadik Vs Satej Patil : ‘राजाराम’ सहकारी कारखान्यांच्या वार्षिक सभेत गदारोळ, सतेज पाटील समर्थकांची समांतर सभा

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला अटक, ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली कारवाई, विमानतळावर जप्त केले कोट्यवधी कोकेन

Latest Marathi News Live Update : पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको; बिडकीन येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT