वाल्हे, ता. २९ : पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात व ‘महर्षी वाल्मीकी ऋषी की जय’च्या जयघोषात वाल्मिकनगरी वाल्हे (ता. पुरंदर) येथून पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या महर्षी वाल्मीकी सोहळा व उत्तराई वाल्मीकी पालखी सोहळा या दोन पालख्यांनी भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
यंदा येथील पालखी सोहळ्यांचे सोळावे वर्ष असून या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वाल्हे गावातून रविवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता विठ्ठल नामाच्या गजरात टाळ- मृदुंगाच्या साथीने भगव्या पताकांच्या गर्दीत महर्षी वाल्मिकींच्या दोन्ही पालख्यांचे क्रमवार वाल्मीकी ऋषींच्या संजीवन समाधीस्थळापासून वाल्हे गावात ‘ज्ञानोबा - तुकाराम’च्या जयघोषात टाळ मृदंगाच्या तालावर मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे वेगवेगळ्या मार्गाने प्रस्थान झाले. गावात प्रदक्षिणेदरम्यान वैष्णवांनी दुमजली मानवी मनोरा तयार करत अभंग गायिले. यावेळी सचिन देशपांडे, पांडुरंग पवार, जगदीश देशपांडे, संदीप दुर्गाडे, तेजस दाते, दत्तात्रेय दाते, अभय देशपांडे आदी उपस्थित होते. आद्यमायणकार महर्षी वाल्मीकी सोहळ्यासाठी यंदाही जेऊर (ता. पुरंदर) येथील शंकरराव जाधव यांच्या अश्वाला मान मिळाला आहे. यामध्ये रामायणकार महर्षी वाल्मीकी सोहळ्याचे संस्थापक अशोक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा पाडेगाव मार्गे
साखरवाडी, सांगवी, मठाचीवाडी, शिंदेवाडी, फोंडशिरस, मेडद, अकलूज, मळखांबी, भंडीशेगाव त्यानंतर वाखरीहून पंढरपूरमध्ये विसावणार आहे, तर उत्तराई वाल्मीक दिंडी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बरोबर जाणार असल्याचे सोहळ्याचे संस्थापक माणिक महाराज पवार यांनी सांगितले.
प्रस्थानप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, माजी सरपंच अमोल खवले, दादासाहेब मदने, हरीश दुबळे, प्रकाश भुजबळ आदींनी पालख्यांचे दर्शन घेऊन सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.