पुणे

वाल्हे परिसरात २५०० जनावरांना लसीकरण

CD

वाल्हे, ता. २ : वाल्हे पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत कार्य मोहीम शिबिर व लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी लसींचा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. दुभत्या जनावरांना लागण होऊन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन प्रतिबंधात्मक लसीकरण देण्यात येत आहे, अशी माहिती आडाचीवाडी सरपंच सुवर्णा बजरंग पवार यांनी केले.

वाल्हे पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत बुधवारी (ता. २) आडाचीवाडी येथे लसीकरण मोहीम सुरू केली. मोहिमेअंतर्गत आजअखेर जवळपास २५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले. वाल्हे पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत वाल्हेसह, आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, पिंगोरी आदि गावांमध्ये टप्प्या-टप्प्याने कार्य मोहीम शिबिर व लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.
जनावरांना पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य विषाणूजन्य, फऱ्या, लम्पी स्कीन आदी आजारांवर प्रतिबंधक उपाय म्हणून पुशविभागातर्फे लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पावसाळ्यामध्ये घटसर्प, लप्मी स्कीन, फऱ्या, विषाणूजन्य आजारांची लागण जनावरांना होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले.

यावेळी सरपंच सुवर्णा पवार यांच्या हस्ते मेहिमेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बजरंग पवार, प्रभाकर जगताप, तुषार पवार, सचिन पवार,
लक्ष्मण पवार, हरिश्चंद्र पवार, सूरज पवार, कुबेर पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, या लसीकरण मोहिमेमध्ये मयूरी भुजबळ, संजय गायकवाड, प्रभाकर जगताप, ऋतिक भुजबळ आदि कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT