वाल्हे, ता. १० : शासनाच्या कृषी विभागाच्या ‘ऊस तेथे बांधावर नारळ’ लागवड योजनेचा प्रारंभ मांडकी व जेऊर (ता. पुरंदर) येथे रोहयोच्या
उपजिल्हाधिकारी डॉ.चारुशीला देशमुख यांच्या हस्ते बांधावर नारळ लागवड करून करण्यात आला. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेअंतर्गत राबवली जात आहे.
मांडकी (ता.पुरंदर) येथे ऊस उत्पादक शेतकरी अशोक खंडेराव जगताप व विश्वास शिंदे यांच्या ऊस शेताच्या बांधावर मंगळवारी (ता. ९) प्राथमिक
स्वरूपात नारळ लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास नीलेश देशमुख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रियंका देशमुख, गोपाल शर्मा, सागर काटकर,
सचिन राऊत, उपसरपंच अतुल जगताप, पोलिस पाटील श्रीतेज जगताप, अमित जाधव, ग्राममहसूल अधिकारी विशाल काळे, विश्वास जगताप, मोहन
किन्हाळे, गजानन शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जेऊर (ता.पुरदंर) येथे ऊस उत्पादक शेतकरी शुभांगी धुमाळ, संतोष चोरगे, दादा धुमाळ, अप्पासाहेब धुमाळ यांच्या शेताच्या बांधावर प्राथमिक स्वरूपात नारळ लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर धुमाळ, पोपट धुमाळ, विजय धुमाळ, चंद्रकांत धुमाळ, ग्रामसेवक अमित जाधव, ग्रामसेवक एस.ए.कदम आदी उपस्थित होते.
वाल्हे मंडल अधिकारी अधिकारी भारत भिसे, तलाठी विशाल काळे, कृषी मंडल अधिकारी अनिल दुरगुडे, कृषीपर्यवेक्षिका माधवी नाळे कृषी
सहाय्यक अर्जुन पासलकर, कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते आदि महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले
प्रत्येक तालुक्यातील किमान दोन गावांत शंभर शेतकऱ्यांच्या ऊस शेताच्या बांधावर नारळ लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यानुसार पुरंदर तालुक्यातील मांडकी व जेऊर या गावांची महसूल व कृषी विभागाने निवड केली आहे
- अमित जाधव, ग्रामसेवक
05223
ग्