पुणे

...अन् प्रशासन खडबडून झाले जागे

CD

वाल्हे, ता. २४ : ‘ठेकेदाराचे सोईस्कर दुर्लक्ष’ या मथळ्याखाली सोमवारी (ता. २२) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले अन् सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी (ता. २४) सातारा-नगर मार्गावरील नीरा (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ ते बारामती रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात सुरुवात केल्याने नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
नीरा (ता. पुरंदर) येथील सातारा-नगर मार्ग हा बारामती, नगर, खंडाळा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत दीड कोट रुपये खर्चून या रस्त्याचे काम केले होते. मात्र काही काळातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून ठेकेदाराकडे दुरुस्तीचा कालावधी असतानाही तो दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा केला मात्र ठेकेदाराकडून वेळकाढूपणा होत असल्याचे चित्र होते. अखेर याबाबत दैनिक ‘सकाळ’ने या समस्येची गंभीर दखल घेत सोमवारी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर बुधवारी संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. बुवासाहेब चौकासह इतर धोकादायक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. या समस्येमुळे अनेक दिवस नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक त्रस्त होते. अपघातांची शक्यता वाढली होती आणि वाहतूक सुरळीत राहण्यात अडथळा येत होता; मात्र, आता खड्डे बुजविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या मार्गाचा वापर करणाऱ्यांना यामुळे रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अपघातांची शक्यता वाढली होती आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. दैनिक ‘सकाळ’ने या समस्येची दखल घेत त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले आणि बुधवारी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविल्याने सर्वांची समस्या दूर झाल्याने ‘सकाळ’चे मनापासून आभार मानतो.
- राजेश काकडे, उपसरपंच, नीरा

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही या खड्ड्यांमुळे त्रस्त होतो. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांना रोज धोका होता. ‘सकाळ''च्या वृत्तानंतर एवढ्या लवकर प्रशासनाने पावले उचलल्याचे पाहून समाधान वाटते. ‘सकाळ’ आणि संबंधित विभागाचे आम्ही आभारी आहोत.
- विजय शिंदे, माजी उपसरपंच, नीरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Exam: प्रतिक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या

तू त्याला मिठी का मारतेस? धनश्री वर्मासाठी तुटतोय अरबाज पटेलचा जीव; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणतात- हा निक्कीचा BF आहे ना?

Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटक

Asia Cup, IND vs BAN: फायनलसाठी टक्कर! बांगलादेशचा कर्णधारच सामन्यातून बाहेर, भारताच्या संघात बदल झाले? पाहा प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली

SCROLL FOR NEXT