पुणे

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा नीरेत सर्वपक्षीयांकडून निषेध

CD

वाल्हे, ता. ९ : ‘‘सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संपूर्ण न्यायसंस्थेवरचा हल्ला आहे. जर देशातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुखच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय, हा प्रकार न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रयत्न असून अशा घटनेचा तीव्र निषेध करतो. हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुणी असे धाडस करणार नाही,’’ अशी भूमिका नीरेच्या (ता. पुरंदर) सरपंच तेजश्री काकडे यांनी मांडली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा येथे सर्वपक्षीय आणि
विविध संघटनांतर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. त्यावेळी सरपंच काकडे बोलत होत्या. याप्रसंगी माजी सभापती दत्ता चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष अॅड. आदेश गिरमे, राजेश चव्हाण, बापूराव पाटोळे, सूर्यकांत कांबळे, अभिषेक भालेराव, अनिल मसने, सुरेश जेधे, दादा गायकवाड, दयानंद चव्हाण, प्रकाश कदम, राजकुमार बनसोडे, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, अकबर सय्यद, अनिल मसने, सचिन मोरे, विक्रम दगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नीरेचे पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्याकडे करण्यात आली. स्वप्नील कांबळे यांनी प्रास्ताविक; तर अमोल साबळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

Government Decision: कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! महिलांना मिळणार मासिक पाळी रजा, सर्व क्षेत्रातील महिलांसाठी लागू

Varinder Singh Ghuman death : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

SCROLL FOR NEXT