वाल्हे, ता. १८ : वाल्हे- दातेवाडी (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा एक दुचाकीस्वार घरी परतत असताना त्याला अचानक रस्ता ओलांडताना बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वागदरवाडी (ता.पुरंदर) येथील आचारी व्यावसायिक दत्तात्रेय पवार हे शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. सुमारे सव्वानऊच्या सुमारास दातेवाडी येथे पोहोचताच त्यांना रस्त्यावर अचानक एक बिबट्या आणि त्यामागे दोन बछडे जाताना दिसली. त्यांनी धैर्य आणि शिताफीने गाडी पुढे नेली व सुरक्षित अंतरावर गेल्यावर त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना याबाबत सावध करत सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल भुजबळ यांच्या माध्यमातून ही माहिती तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. गावातील काही भाग डोंगरालगत असून, सध्या बिबट्याच्या वावराचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
‘अंगावर काटा आला होता’
इतक्या जवळून बिबट्या पाहिल्याचा हा पहिलाच अनुभव होता. त्या क्षणी अंगावर काटा आला होता. मात्र, घाबरून आरडाओरडा केल्यास काही विपरीत घडू शकत होतं, हे लक्षात घेऊन मी गप्पच राहिलो आणि गाडी पुढे चालवत नेली. पुढे काही अंतरावर गेल्यावर तातडीने परिसरातील नागरिकांना याची माहिती देत सावध करत सतर्क राहण्याचे आवाहन केले, असे दत्तात्रेय पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.