पुणे

महात्मा फुलेंचे कार्य उद्योगांपेक्षा महान : प्रा. दुर्गाडे

CD

वाल्हे, ता. २८ : ‘‘आर्थिक यशापेक्षा समाजजागृती अधिक महत्त्वाची असते हे जगाला दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले यांचे कार्य
उद्योगांपेक्षा व्यापक आणि मानवतेसाठी अमूल्य होते. शिक्षणाचा प्रसार, स्त्री-शूद्र-अतिशूद्र यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समतेचा मूलभूत विचार हे त्यांचे खरे,’’ असे प्रतिपादन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. २८) महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त येथील क्रांतिसूर्य समता विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी प्रा. डॉ. दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, माजी सभापती गिरीश पवार, महादेव चव्हाण, संभाजी पवार, अशोक बरकडे, राजेश चव्हाण, समदास राऊत, त्रिंबक भुजबळ, मुख्याध्यापक भरत वाघोले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, माजी सभापती गिरीश पवार, राजेश चव्हाण, दादासाहेब गायकवाड, राजेंद्र बरकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी नुकतेच वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमानंतर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने खाऊ वाटप केले. क्रांतिसूर्य समता विकास प्रतिष्ठानचे तुषार भुजबळ, अनिल भुजबळ, दादासाहेब राऊत, भालचंद्र भुजबळ, राहुल भुजबळ, सुभाष दुर्गाडे, निशांत भुजबळ, कुणाल भुजबळ आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
क्रांतिसूर्य समता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. शंकर भुजबळ यांनी सूत्रसंचालन तर सूर्यकांत भुजबळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Hit-and-Run Case: नाशिकमध्ये पुण्यातील ‘पोर्श’सारखा थरार! CCTV मध्ये भीषण हिट अँड रन कैद; बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा ताब्यात

Latest Marathi News Live Update : मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावर तरुणांकडून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरू

नवीन ट्विस्ट! पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटणार; बांगलादेaश T20 World Cup मध्ये परतणार, जय शाह करेक्ट कार्यक्रम करणार

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT