वाल्हे, ता. ३० : पुरंदर तालुक्यातील नीरा रेल्वे स्टेशनवर पुणे-सातारा डेमूतून उतरत असताना १८ वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला असून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आदित्य साहेबराव होळकर (वय १८, रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती) असे जखमी युवकाचे नाव आहे. जखमी आदित्य होळकर याला तातडीने लोणंद येथे नेण्यात आले. त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.