यवत, ता. १९ : या वर्षी अधिकृत मंडळांची संख्या वाढलेली आहे. म्हणजेच गावागावांत, गल्लीबोळात उत्सवाचा उत्साह जाणवणार आहे. मात्र, हा उत्साहात कायदा, शिस्त, पर्यावरण आणि सामाजिक सलोखा या चार स्तंभावर अढळ राहिला पाहिजे. यावर पोलिसांनी विशेष भर दिला आहे. डीजेचा, लेझर लाईट्सचा झगमगाट आणि वीजचोरी यावर प्रशासनाने स्पष्ट बंदी घातली आहे. पारंपरिक वाद्य, प्रबोधनपर देखावे, अन्नदान आणि पर्यावरणपूरक मूर्ती हा उत्सवाचा गाभा आहे. याकडे सर्व मंडळांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे असे आवाहन बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी केले.
यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने यवत (ता. दौंड) येथील गणेश मंगल कार्यालयात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी गणेश बिरादार व बापूराव दडस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काही मंडळांकडून चांगल्या संकल्पना या वेळी मांडण्यात आल्या. प्रवीण थोरात यांनी डीजेचा खर्च टाळून वृक्षारोपण व अनाथाश्रमांना मदत करण्याचा संकल्प केला. तर श्रीनाथ मित्र मंडळाचे उपाध्यक्ष कुंडलिक खुटवड यांनी सामाजिक प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची ग्वाही दिली. अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले की, गणेशोत्सव हा तरुणांच्या सार्वजनिक जीवनातील पहिला धडा आहे. इथेच अनेक तरुणाच्या सामाजिक व राजकीय जीवनास सुरवात होते. उत्सवाला गालबोट न लावता तो ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक व्हावा, ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. गावामध्ये उत्सव हे एकत्र येण्याचे, सगळे मतभेद विसरून बंधुभावाने साजरे करण्याचे साधन आहे. यवत परिसरातील ३०६ मंडळे पोलिस प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अमली पदार्थ विरोधी मंडळाच्या वतीने पथनाट्य सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.