Rice. sakal
पुणे

तांदळाच्या उत्पादनात भारत दुसरा

देशात प्रत्येक वर्षी तांदळाचे उत्पादन वाढत आहे

CD

मार्केट यार्ड: यंदा देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात डिसेंबरअखेरपर्यंत एक हजार २२० लाख टन इतके उत्पादन झाले आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर चीन पहिल्या स्थानावर असून, तेथे यंदा एक हजार ५०० लाख टन तांदळाचे उत्पादन झाले आहे.

देशात प्रत्येक वर्षी तांदळाचे उत्पादन वाढत आहे. यावर्षी पाऊस, पाणी, बी-बियाणे व हवामान भातशेतीसाठी उपयुक्त ठरल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने जगभरातून बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. मागील आर्थिक वर्षात बिगर बासमती तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे. १३० लाख टनांपैकी युरोपियन देशांनी जगात सर्वांत जास्त तांदूळ मागविला होता. युरोपियन देशांनी २५ लाख टन तांदूळ आपल्याकडून आयात केला. त्यापाठोपाठ फिलिपिन्स २३ लाख टन, चीन २२ लाख, सौदी अरब देशांनी १५ लाख, इराण व दुबई प्रत्येकी १२ लाख, मलेशिया ११ लाख टन, अशा बऱ्याच देशांना भारताने बिगर बासमती तांदूळ निर्यात केला आहे.

शहा म्हणाले, ‘‘२०१९-२० मध्ये बासमती तांदळाची निर्यात ४४.५० लाख टन व त्याचे मूल्य साधारणतः ३१ हजार २५ कोटी रुपये होते, तर २०२०-२१ मध्ये बासमती तांदळाची निर्यात ४६ लाख टन झाली व त्याचे मूल्य ३१ हजार कोटी रुपये होते. बिगर बासमती तांदळाची निर्यात गेल्या दोन वर्षांत म्हणजे २०१९-२० मध्ये ५०.३५ लाख टन झाली व त्याचे मूल्य १४ हजार ३५० कोटी रुपये होते. तसेच, २०२०-२१ मध्ये १३० लाख टन आणि त्याचे मूल्य सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपये इतके होते.

मागणीमुळे दरांत वाढ
या महिन्यात सौदी अरेबियाकडून बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. एका सौदी कंपनीने नुकताच ४० हजार टन बासमती तांदळाचा सौदा साधारणतः एक हजार २० डॉलर प्रति टन या दराने आपल्याकडे केला आहे. त्यामुळे बासमती ११२१, १४०१ व १५०९ यांचे दर या महिन्यामध्ये १० टक्क्याने वाढले आहेत.

‘‘यंदा संपूर्ण जगात तांदळाचे उत्पादन सुमारे पाच हजार ६६ लाख टन झाले आहे. मागील वर्षी पाच हजार ३१ लाख टन इतके झाले होते. २०१९-२० मध्ये पाच हजार १२ लाख टन झाले होते. जगात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश चीन आहे.’’
राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड

वर्ष उत्पादन (टनामध्ये)
२०२१-२२...१२२० लाख
२०२०-२१...१२०० लाख
२०१९-२०...११८४ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT