Ganeshkhind Road Sakal
पुणे

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये होणाऱ्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये होणाऱ्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये (Pune University Chowk) होणाऱ्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम (Flyover Construction) सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल (Changes) केले आहेत. गुरुवारपासून (ता. २३) प्रायोगिक तत्त्वावर हा बदल केला आहे.

शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार आहे, त्यासाठी चतुःशृंगी वाहतूक विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये गुरुवारपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात येणार आहे.

असा आहे वाहतूक बदल...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक-पाषाण रस्ता-पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय-अभिमानश्री पाषाण चौक-बाणेर रस्ता सकाळनगर-यशदा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक असा रस्ता एकेरी मार्ग केला आहे. शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकातून बाणेर व पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांवरील मार्गाचा वापर करावा.

पाषाणकडून पुणे विद्यापीठ चौकात जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री पाषाण चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्यावर येऊन पुणे विद्यापीठ चौकातील रस्त्याचा वापर करावा.

गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंक शेजारील भोसलेनगरमध्ये जाणाऱ्या रस्त्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहने भोसलेनगरमधून जाण्यासाठी एकेरी मार्ग केला आहे. भोसलेनगरमधून मुख्य गणेशखिंड रस्त्यावर येण्याकरिता रेंजहिल्स रस्त्याचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT