ketki mategaonkar sakal
पुणे

केतकी माटेगावकरचा संगीत अल्बम लवकरच...

गायन व अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण करणारी पुण्याची युवा कलाकार केतकी माटेगावकर हिने आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले

सकाळ वृत्तसेवा

पुणे :(Pune News) गायन व अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण करणारी पुण्याची युवा कलाकार केतकी माटेगावकर हिने आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केतकीने संगीत दिग्दर्शन केलेला ‘माई’ हा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केतकीने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. (music album 'Mai' is coming soon Ketaki mategaonkar made the official announcement at a press conference)

केतकीची आई व प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर, वडील पराग माटेगावकर यावेळी उपस्थित होते. या अल्बमविषयी केतकी म्हणाली, ‘‘संगीतकार म्हणून माझा हा पहिलाच अल्बम आहे. असे असतानाही महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर आणि माझे गुरू पं. रघुनंदन पणशीकर व आई सुवर्णा माटेगावकर या दिग्गज कलाकारांनी या अल्बममधील रचनांना आवाज दिला आहे. पहिल्याच प्रयत्नावर इतक्या लोकप्रिय आणि जागतिक कीर्तीच्या गायकांनी विश्‍वास टाकला, हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.’’ हा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत असून यामध्ये दोन भागांत एकूण नऊ गाणी असतील. केतकीची पणजी माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध केल्या असून धार्मिक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे. लवकरच केतकी माटेगावकर या अधिकृत युट्यूब चॅनलसह विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे ही गाणी रसिकांना अनुभवता येणार आहेत. (first album of ketaki mategaonkar as a musician)

‘महिला संगीतकार उदयास याव्यात’
संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खाडीलकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावे आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावे, असे मला मनापासून वाटते. महिला संगीतकारांच्या चांगल्या रचनादेखील रसिकांच्या पसंतीस उतरतील, अशी अपेक्षा केतकीने व्यक्त केली.(Women musicians should emerge)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT