Chandrakant Patil
Chandrakant Patil Sakal
पुणे

राज्याची तिजोरी आहे कशासाठी? : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 येथे अटलशक्ती महासंपर्क अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोथरुड - उत्पन्न कमी झाले म्हणून शेतक-याची कर्जमाफी (Farmer Debt forgiveness) करता आली नाही. कोविड मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना पन्नास हजाराची मदत (Help) देता आली नाही. एसटीच्या कर्मचा-यांना (ST Employee) पगारवाढ देता येत नाही. नाही असे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी (Ajit Pawar) सभागृहात दिले पण मंग राज्याची तिजोरी कशासाठी आहे असा प्रश्न उपस्थित करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, देत नाही जा असे म्हणून चालत नाही.

कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 येथे अटलशक्ती महासंपर्क अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार पाटील म्हणाले की, अजित दादांमा नेहमीच असे वाटते की माझा परखडपणा किती मोठा आहे. अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ठ नीट सांगायची असते. समजा तुम्हाला असे वाटत असेल की विलिनीकरण शक्य नाही. तर ते का शक्य नाही. तुम्ही जर जीवन प्राधिकरणाचे विलिनीकरण केले तर एसटीचे का करणार नाही. त्यात जर तांत्रिक अडचण वाटत असेल तर ती काय आहे. तुमची अडचण काय आहे. २३ लाख कोटी राज्याचे सकल उत्पन्न झाले. त्याच्या २५ टक्के कर्ज घेता येते. त्यातून तुम्ही तरतूद करु शकता.

मुकेश काळे व दादासाहेब कोरेकर यांच्या घरी भेट देऊन आमदार पाटील यांनी अभियानाची सुरुवात केली. यावेळी शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, अमित तोरडमल, स्वप्नील राजीवडे, ओम धावडे, रणजित हगवणे उपस्थित होते. महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व योजनांची माहिती दीड लाख घरात पोहचविण्याचे काम तीस हजार कार्यकर्ते करणार आहेत.

  • सरकारी कर्मचा-यांच्या समकक्ष पातळीवर एसटी कर्मचा-यांना आणावे.

  • स्पर्धा परिक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी

  • टीईटीची परिक्षा रद्द होवून नव्याने व्हावी.

  • परिक्षा घोटाळ्यात आमचा कोणी कार्यकर्ता असेल तर त्याला फाशी द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT