पुणे

जलवाहिनीच्या कामाला मिळेना गती

CD

कोथरूड, ता. १ ः पुणे शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम कर्वेनगर भागातील सहवास सोसायटी परिसरात सुरू आहे. १५ एप्रिल रोजी सुरू झालेले हे काम दोन महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरात ज्या जल, मल, विद्युत, गॅस वाहिन्या टाकल्या आहेत त्यांचे कोणतेही नकाशे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या कामाला विलंब होत आहे. त्याचा परिणाम म्हणून धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी, वेळ वाया जाणे, वाहिनी फुटल्यावर संबंधित सोसायट्यांची अडचण होणे आदी त्रास आम्हाला सहन करावे लागत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे सर्वांनाच अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, असे चिंतामणी सोसायटीतील शंतनू खिलारे म्हणाले.

याबाबत विक्रम पेंडसे म्हणाले की, सुदैवाने आमच्या परिसरातील काम संपले आहे. इतर वाहिन्यांचा अडथळा असल्याने येथील काम संथगतीने सुरू होते. आता हे काम भुजबळ बंगला चौकाजवळ येऊन स्थिरावले आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत आहे.

सध्या जेथे काम सुरू आहे. तेथे ८ मीटरच्या भागात ११ सेवावाहिन्या आहेत. यामध्ये ९ उच्चदाब वाहिन्या, एक मलवाहिनी व जलवाहिनी आहे. एखादी वाहिनी लागली की तिच्या खालूनच पाइप काढावा लागतो. उच्चदाब वाहिनीला धक्का लागला तर त्याच्या एका दुरुस्तीला लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. तीनशे मीटरची वाहिनी टाकण्यासाठी आम्हाला तीन महिने लागले. मागच्या महिन्यात मी दोनच पाइप टाकू शकलो. सोसायटी परिसरात वेगवेगळ्या वाहिन्यांचे जाळे आहे. त्यातून काम करणे अवघड व वेळखाऊ होते. त्यामुळे मी जे काम घेतले ते तोट्यात गेले. त्यामुळे हे काम मी बंद केले होते. पण आता पुन्हा हे काम करायला घेतले आहे.
- अभिषेक सारडा, उप कंत्राटदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, यात्रेकरू थोडक्यात बचावले...थरारक व्हिडिओ पाहा

मागच्या वर्षी 1 हजार, पण यंदा 10 हजार टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही; शरद पवारांची टीका

Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन

Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Team India Coach: 'दबाव अन् राजकारण...', भारताच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल केएल राहुलने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT