पुणे

‘खराडीतील प्रकल्पाची चौकशी करा’

CD

पुणे, ता. ३ ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे महापालिकेतर्फे खराडी येथील सर्व्हे क्रमांक ५७ मध्ये सुरू असलेल्या प्रकल्पातील घरे गरजूंना मिळत नसून अन्य लोकांना मिळत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी अशोक भाट, भरत विटकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केली.
या ठिकाणी सोडत पद्धतीने घरे दिली जाणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, कोरोनाकाळात ज्यांनी घरे मिळण्यासाठी अर्ज केले होते, त्यातील काहींना घरे मिळाली. पण, अनेकांना वेळेत पैसे भरता आले नाहीत. त्यामुळे त्यांची नावे रद्द झाली. महापालिकेने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाची घोषणा केली होती. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे गरजू नागरिकांना याचा लाभ मिळत नसून, अन्य लोकांनाच या घरांचे वाटप होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अशोक भाट आणि भरत विटकर यांनी केली. यावेळी योजनेअंतर्गत अर्ज करणारे रहिवासी अशोक लष्करे, अयाझ पटवेकर, राजेश भान, अजहर शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! 'पोक्सो'मधील फरार संशयित गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : पुण्यात 'ऑपरेशन लोटस' ,२२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Kolhapur Muncipal : विधानसभा निवडणुकीसारखीच खर्च दरसूची; उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर

Divyang Marriage Scheme : आता विवाहासाठी दिव्यांगांना मिळणार 'इतके' लाख रुपये; निम्मी रक्कम असणार फिक्स डिपॉझिट, कागदपत्रे आणि अटी काय?

SCROLL FOR NEXT