TET Exam
TET Exam sakal
पुणे

टीईटी गैरव्यवहार प्रकरणी कदमला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक आश्विनकुमार शिवकुमार याने मेल पाठवलेल्या निखिल कदम याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात आरोपींनी ५६ परीक्षार्थींकडून प्रत्येकी ४० हजार रुपये घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कदम याने आश्विनकुमार शिवकुमार याला चार ऑक्टोबर २०१९ रोजी केलेल्या ई-मेलमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कदम याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.(TET Exam)

कदम याच्यावतीने ड. अविनाश आव्हाड, ड. सुजित घुमरे आणि रोहन रणदिवे यांनी कामकाज पाहिले. कदम यांची नियुक्ती केवळ सहा महिन्यांपूर्वी झालेली आहे. पोलिस तपासामध्ये त्यांच्याकडून जे ई-मेल सदर तपासामध्ये आढळून आले, त्यात फक्त काही विद्यार्थ्यांची यादी मिळाली. याबाबत दाखल तक्रारीमध्ये कदम यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यांच्याविरुद्ध पुरावा आढळून आलेला नाही. तपासामध्ये जमा केलेल्या फोनमध्ये आढळून आलेल्या मेलच्या आधारे कदम यांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली. मात्र, तपासामध्ये कदम यांच्याविरुद्ध इमेल सोडून दुसरा कोणताच ठोस पुरावा समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली.(Pune Exam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT