पुणे

जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण ३३ हजारांच्या घरात

CD

जिल्ह्यात आढळले
६११० कोरोना रुग्ण
पुणे, ता. ११ : जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार ११० नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील ३ हजार ४५९, पिंपरी चिंचवड १ हजार ७०६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ७११, नगरपालिका कार्यक्षेत्र १२१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातल ११३ रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
दिवसभरात एकूण १ हजार ६३८ जण कोरोनामुक्त झाले. यात पुणे शहरातील १ हजार १०४ जण, पिंपरी चिंचवड ३८७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ९१, नगरपालिका कार्यक्षेत्र ३७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्णांची एकूण संख्या आता ३२ हजार ६७२ झाली. यातील १ हजार ५०४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु असून उर्वरित ३१ हजार १६८ गृहविलगीकरणात आहेत. यामध्ये पुणे शहरातील १९ हजार ४५२ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

सक्रिय रुग्ण वाढत असले तरी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्‍यक असल्याचे मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT