पुणे

लोणीकंद येथील बापलेकाच्या खूनप्रकरणी तीन जणांना अटक

CD

पुणे, ता. १४ : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून लोणीकंद येथे टोळक्‍याने बापलेकावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा नुकताच खून केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली.

प्रतीक अनिल कंद (वय २८), आशुतोष नानासाहेब शिंदे आणि नानासाहेब शिंदे (सर्व रा. लोणीकंद), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे (वय २२), कुमार मारुती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद), अशी खून झालेल्या बापलेकाची नावे आहेत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे नावाच्या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी प्रथमेशवर गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी तो जामीनावर कारागृहाबाहेर आला होता. बुधवारी (ता १२) रात्री तो व त्याचे वडील कारमधून लोणीकंदमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या प्रतीक, आशुतोष व नानासाहेब यांनी त्यांच्या साथीदारांच्या प्रथमेशवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यावेळी त्याचे वडील कुमार शिंदे हे त्याला वाचविण्यासाठी गेले असता टोळक्‍याने त्यांच्यावरही धारदार शस्त्रांनी वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वरील तिघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT