पुणे

विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल

CD

डिजिटायझेशन, तंत्रज्ञान, ग्लोबल क्रेडिबिलिटी, कर रचना जैसे थे, क्रिप्टोकरन्सीला चाप लावणारा असा हा सर्वव्यापी अर्थसंकल्प आहे. स्टार्टअप, शेतकरी, ई-शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि जीडीपीला नऊ टक्क्यांच्या पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे. ८० लाख घरांची निर्मिती, स्वच्छ ऊर्जा, ड्रोन तंत्रज्ञान, ई-विद्या अंतर्गत २०० चॅनेल्सची निर्मिती हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
- प्रा. डॉ. संजय चोरडिया,
संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

कर कायद्यात सतत बदल करण्याची प्रवृत्ती कमी होत आहे. सहकारी संस्था, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या तरतुदी आहेत. विवरण पत्र काही त्रुटी असल्यास ते सुधारण्याचा प्रस्ताव योग्य आहे. एकंदर कर कायद्यास स्थैर्य व प्रामाणिक कर दात्यांसाठी चांगला अर्थसंकल्प आहे.
- सीए चंद्रशेखर चितळे,
केंद्रीय समिती सदस्य, आयसीएआय

देशातील पाच सर्वोच्च संस्थांना २५ हजार कोटींचा निधी देणार, अशी घोषणा केली असली तरी या संस्था कशा सर्वोच्च आहेत, हे कसे ठरणार? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळणार की अदानी-अंबानींच्या संस्थांना निधी मिळणार, याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. केंद्र सरकारने गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीमध्ये वित्तीय व्यवस्थापन, फिन-टेक, गणित यासह इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी परदेशी विद्यापीठांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु महाराष्ट्राच्या पदरात शिक्षणासाठी विशेष तरतूद केलेली नाही.
- प्रथमेश आबनावे,
खजिनदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : नगरविकास खाते पैसे खाण्याचे कुरण, संजय राऊत यांचा मोठा आरोप

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT