SSC HSC Board exam  Sakal
पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो; मन मे हैं विश्‍वास, होंगे कामयाब...

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.

सकाळ वृत्तसेवा

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.

पुणे - दहावी (SSC) आणि बारावीचे (HSC) विद्यार्थी (Student) दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी (Written Exam) समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावयाची काळजी...

परीक्षेची व्याप्ती

१) दहावीचे परीक्षार्थी - १६,२५,३११

२) बारावीचे परीक्षार्थी - १४,७२,५६२

३) परीक्षा पार पाडणारे कर्मचारी - १, ७५,०००

४) परीक्षा केंद्र -

इयत्ता - प्रचलीत - आत्ताचे

दहावी - ५०११ - २१,३२४

बारावी - २९४३ - ९६३०

ठळक बाबी

- दहा मिनीटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार

- ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त १५ मिनिटे

- ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त ३० मिनिटे

- विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र येईल, अशी व्यवस्था बोर्ड करणार

- विद्यार्थी संख्या अधिक असेल तर शाळेच्या जवळचेच परीक्षा केंद्र

- गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणार

विद्यार्थ्यांनो हे करा

- लेखनाचा सराव

- विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करा

- परीक्षेतील वेळेचे नियोजन

- प्रत्येक धड्याखालील स्वाध्यायाचे प्रश्न

- अभ्यासाची जागा निश्चित करा

विद्यार्थ्यांनो हे करू नका

- रात्री उशिरापर्यंत जागरण

- नकारात्मक विचार करणे

- समाजमाध्यमे आणि लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टी टाळा

- शेवटच्या क्षणाला भरभर अभ्यास टाळा

परीक्षेच्या दिवशी काय कराल

- आपल्याच शाळेत परीक्षा असल्याने विनाकारण भीती बाळगू नका

- परीक्षेच्या वेळेआधी केंद्रावर दाखल व्हा

- प्रश्नपत्रिका हातात आल्यावर शांतपणे वाचा

- उत्तरपत्रिकेवरील माहिती शांतपणे लिहा

- सोपे प्रश्न आधी सोडवा, सर्व प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा

- पर्यवेक्षक आपल्याच मदतीसाठी, काही शंका वाटल्यास नक्की विचारा

पालकांनो ही घ्या काळजी

- मुलाच्या आरोग्याची

- रात्री ११ ते सहा ६ मुलांनी झोप घेतली पाहिजे

- परीक्षेच्या काळात पाल्याला आनंदी ठेवा

परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळावे

शाळांमध्येच परीक्षा केंद्र असल्याने गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि केंद्रप्रमुखांची आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्राला बट्टा लागेल असे वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर देशाचे भविष्य अवलंबून आहे. कॉपीसारखे प्रकार घडल्यास प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांचे खच्चीकरण होते.

कोरोनाचा विचार करून परीक्षेला समोर जाणे विद्यार्थ्यांनी टाळावे. परीक्षेला अर्धातास वाढवून दिला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचावी आणि निश्चित स्वरूपाने येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आधी सोडवावी. धड्याखालील स्वाध्याय सोडवावेत, कारण ८० टक्के प्रश्न त्यातून येणार आहे.

- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT