पुणे

लालपरी धावू लागली अन चेहऱ्यावर हास्य फुलले

CD

पुणे, ता. २४ : तो काळा क्षण पुन्हा या डोळ्यांनी पाहू नये, अशीच परमेश्वराला प्रार्थना. स्वारगेट बस आगारात खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असायच्या. आयुष्यभर त्यांना विरोध केला, तेच आमच्या घरात घुसले. आमची लक्ष्मी असलेली लालपरी धूळखात पडली. ते दिवस आता आठवायला देखील नको वाटतात. अंधकाराचा मळभ दूर लोटून जीवनात आशेचा सूर्योदय झाला. आमचे सगेसोयरे पुन्हा एसटीत रुजू झाले. लालपरी पुन्हा एकदा सुसाट धावू लागली, यातच सर्व काही आले असल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा एसटीची वाट धरली. जेवढा आनंद कर्मचाऱ्यांना झाला, त्याहून अधिक आनंद त्यांच्या कुटुंबीयांना झाला. कोणाच्या वडिलांनी हाती स्टेरिंग घेतले तर कुणाच्या नवऱ्याने तिकिटांची टक-टक सुरु केली. पाच महिने थांबलेला आयुष्याचा गाडा एसटीच्या रूपाने पुन्हा धावू लागला. एसटीत रुजू झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे.
एमएससीचे शिक्षण घेत असलेल्या राजकन्या मुंडे म्हणतात, ‘‘माझे वडील संजय मुंडे एसटीत चालक म्हणून कार्यरत आहेत. ते आंदोलनात सहभागी झाले. पाच महिन्यांपासून ते कामापासून दूर राहिले. त्यामुळे वेतन नाही. घर व शिक्षणाच्या खर्चामुळे आम्ही सर्वजण मेटाकुटीला आलेलो. खूप विचित्र परिस्थिती मी अनुभवली. जे अनुभवलं ते शब्दांत न मांडण्यासारखं आहे. जे झालं ते झालं. आता पप्पांनी पुन्हा एकदा स्टेरिंग हाती घेतले आहेत. लालपरीने देखील टॉप गियर टाकला, यातच सर्व काही आले. हा आनंदच आमचा सोबती आहे.’’
अशीच काहीशी भावना सावित्रा कच्छवेनी मांडली. त्या म्हणतात, ‘‘माझे पती गजानन स्वारगेट आगारात चालक कम वाहक आहेत. मला दोन लहान मुले. पतीचा संपात सहभाग होता. त्यामुळे पगार नाही. जेवढी जमापुंजी होती, ती रोजचे खर्च भागविण्यात संपली. कधी नातलग तर कधी शेजाऱ्यांकडून उसनवारी केली. पती घरीच असायचे. त्यांना कामाविना पाहून मनात कोलाहल होत होती. पगारच नव्हता. त्यामुळे घरभाडे, शाळांची फी थकलेली. जिथे रोजचा जगण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला होता. तिथे फी देण्याची बिशाद आमच्यात नव्हती. आता ते पुन्हा कामावर जात आहेत, त्याचाच खूप आनंद झाला आहे. काहीच न मिळण्यापेक्षा, जे मिळते आहे ते घेणे शहाणपणाचे ठरते, हे या संपानी दिलेली शिकवणूक.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT