पुणे

दाखल होण्यापूर्वीच १८९ दावे निकाली

CD

पुणे, ता. ४ : मतभेद झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारे दावे चर्चेतून मिटण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चला बोलूया’ या उपक्रमास मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. गेल्या चार वर्षात या उपक्रमांतर्गत १८९ दावे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच मिटले आहेत.

कौटुंबिक वादाचा दावा न्यायालयात दाखल होण्यापूर्वी त्यातील दाव्यांमध्ये तक्रारदारांचे समुपदेशन व्हावे व त्यांच्यातील वाद दावा दाखल न करताच मिटावा, यासाठी ऑॅगस्ट २०१८ साली न्यायालयात ‘चला बोलूया’ या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. त्यात २०२१ अखेरपर्यंत ९५४ तक्रारी समुपदेशनासाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील १८९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमात सर्वाधिक ८० तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तर २०१९ साली सर्वाधिक ३७३ तक्रारी समुपदेशनासाठी पाठविण्यात आल्या होत्या. सध्या ९४ तक्रारींवर समुपदेशन करण्यात येत आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या पोटगी, पोटगीची वसुली, मुलांचा ताबा, मुलांच्या भेटीबाबत झालेले वाद, आर्इ-वडिलांचा सांभाळ, घटस्फोट, नांदायला येण्यासाठी केलेले अर्ज, विविध दाव्यांमधील अंतरिम अर्ज यासह न्यायालयात दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या दाव्यांबाबत या तडजोडीच्या केंद्रात समुपदेशन केले जाते.


कौटुंबिक न्यायालयात ऑगस्ट २०१८ पासून ‘चला बोलूया’ हे वादपुर्व दाव्याच्या तडजोडीचे केंद्र सुरू आहे. यामध्ये सात ते आठ समुपदेशक असून ते विविध क्षेत्रात पारंगत आहेत. त्यांच्याद्वारे समुपदेशन केले जाते. कौटुंबिक वाद मिटण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन अनेक खटले न्यायलयात दाखल होण्यापूर्वीच निकाली निघाले आहेत.
-सुभाष काफरे, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय


चला बोलूया उपक्रमात दाखल व निकाली दावे :
वर्ष - दाखल - निकाली - निकाली निघाले नाहीत- प्रलंबित
२०१८ - ३५- ३- १२- २०
२०१९ - ३७३- ६७- २२९ - ९७
२०२० - २०९ - ३९ - १२१ - १४६
२०२१ - ३३७ - ८०- ३०९ - ९४
एकूण - ९५४ - १८९ - ६७१ - ३५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT