पुणे

विद्यापीठातून करा ‘हॉर्वर्ड’चा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हार्वर्ड बिझनेस स्कूलसमवेत करार

CD

पुणे, ता. ४ : तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेत आहात का!, अहो मग तुम्हाला आता ‘हार्वर्ड’चाही अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून करता येणार आहे. काय आश्चर्य वाटतंय ना! अहो, पण हे शक्य झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हार्वर्ड बिझनेस स्कूलशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आता विद्यापीठातून थेट ‘हार्वर्ड’मधील अभ्यासक्रम करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ उपक्रमांतर्गत हार्वर्ड बिझनेस स्कूलने वाणिज्य, उद्योग आणि व्यवस्थापन यांच्याशी संबंधित जवळपास १५ ते १६ प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्स) विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहेत. विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’च्या अधिकृत पोर्टलवर सध्या विविध क्षेत्राशी निगडित जवळपास १५० हुन अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आता या अभ्यासक्रमात हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमांची भर पडली आहे.

विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘‘हार्वर्ड बिझनेस स्कूलसमवेत झालेल्या करारामुळे आणि त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी मिळू शकणार आहे. यामध्ये डिझाइन थिंकिंग ॲण्ड इनोव्हेशन, फायनान्शिअल अकाउंटिंग, क्रेडेन्शिअल ऑफ रिडनेस असे अभ्यासक्रम विद्यापीठात सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करता येणार आहेत.’’

‘‘विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस’ उपक्रमांतर्गत ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या माध्यमातून राबविण्यात येणारे सगळे अभ्यासक्रम हे विद्यापीठात आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करता येणार आहेत. त्याचबरोबरच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनादेखील हे अभ्यासक्रम करता येणार आहे. एवढंच नव्हे, तर त्या-त्या क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकदेखील ‘स्पेशलायझेन’ मिळविण्यासाठी हे अभ्यासक्रम करू शकणार आहेत. हे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) अभ्यासक्रम झालेल्या विद्यार्थ्यांना हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रमाणपत्र मिळणार आहे.’’
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य :
- अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले : विद्यार्थी, माजी विद्यार्थी, व्यावसायिक सहभागी होऊ शकतात
- अभ्यासक्रमाचा कालावधी : एक ते चार महिने
- क्रेडेन्शिअल ऑफ रिडनेस अभ्यासक्रम १० ते १७ आठवड्यांचा असेल
- ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे मिळणार प्रमाणपत्र
- अभ्यासक्रम असणार ऑनलाइन

काही ऑनलाइन अभ्यासक्रम :
- डिझाइन थिंकिंग ॲण्ड इनोव्हेशन
- सस्टेनेबल बिझनेस स्ट्रॅटेजी
- लिडरशिप प्रिन्सीपल्स
- ऑर्गनायझेश्नल लिडरशिप
- लिडिंग विथ फायनान्स
- ग्लोबल बिझनेस
- मॅनेजमेंट इसेन्शिअल्स
- बिझनेस ॲनालिटिक्स
- फायनान्शिअल अकाउंटिंग
- इकॉनॉमिक्स फॉर मॅनेजर्स
- अल्टरनेटिव इनव्हेस्टमेंट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT