पुणे, ता. २३ ः मुंबई आणि नागपूरच्या तुलनेत पुणे विभागातील नागरी सहकारी बॅंकांचा कारभार अधिक समाधानकारक असल्याचे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. बँकिंग सेवांसह अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे हे निष्कर्ष प्राप्त झाले आहे. यासंबंधीचे संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॅनेजमेंटमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.
नागपूरच्या दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधक अपर्णा कुलकर्णी आणि एस. बी. सीटी महाविद्यालयाचे डॉ. सुजित मेत्रे यांनी यासंबंधीचे संशोधन केले आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून उत्तम सुविधा देणाऱ्या बॅंकाच यशस्वी होतात. त्याआधारे नागरी सहकारी बॅंकांचे मूल्यमापन करण्यासाठी काही मानक निश्चित केल्याचे शोधनिबंधात म्हटले आहे. भ्रमणध्वध्वनीवरील प्रतिसाद, बॅंकिंग सेवा, अधिकाऱ्यांचे वर्तन, ई-मेलला दिले जाणारे उत्तर ही मानके निश्चित केली होती. बॅंकेच्या प्रत्यक्ष ग्राहकांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे निष्कर्ष मांडण्यात आले. यामध्ये पुणे विभागातील ६६.६७ टक्के, मुंबई विभागातील ५० टक्के आणि नागपूर विभागामधील ६०.८३ टक्के नागरी बॅंकांचे ग्राहक समाधानी आहेत.
महत्त्वाचे निष्कर्ष ः
- नागरी सहकारी बॅंकांना ई-मेलद्वारे उत्तर देण्यासाठी सुधारणा आवश्यक
- इतर क्षेत्रातील बॅंकांच्या तुलनेत असमाधानकारक प्रगती
- अधिकाऱ्यांच्या वर्तनासह बॅंकिंग सुविधांमध्ये अधिक बदल आवश्यक
- ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधांसाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे
- बॅंकिंगसेवा देण्याबाबत तुलनेने पुणे विभागातील नागरी बॅंका सरस, मात्र ई-मेल सेवा नसल्यात जमा
‘‘पुणे शहरात सहकाराची बीजे आणि संस्कृती रुजलेली आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात त्याची वाढ योग्यप्रकारे झाली आहे. सहकार तत्त्वावर चालणाऱ्या अनेक संस्था यशस्वीपणे सुरू आहेत. देशातील नागरी बॅंकाची स्थिती पाहता ९० टक्के बॅंका ‘अ’ वर्गात असून, रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे पालन करतात. तसेच, आयटी हबमुळे पुण्यातील सहकारी बॅंकांचे आधुनिकीकरण झालेले आहे. अन्य शहराच्या तुलनेत ही सकारात्मक बाब आहे.’’
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बॅंक असोसिएशन
समाधानी ग्राहक (टक्क्यांमध्ये)
तपशील ः पुणे विभाग ः मुंबई विभाग ः नागपूर विभाग
दूरध्वनी संपर्क ः १५ ः ४५ ः ६७
बॅंकिंग सेवा ः ८५ ः २.५ ः ५
ई-मेल सेवा ः ० ः ५ ः ५
अधिकाऱ्यांचे वर्तन ः ९७.५ ः ९२.५ ः १००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.